शेतजमीन हलकी -भारी वाटणीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी चौघांवर गुन्हा दाखल वाशी तालुक्यातील घटना
धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : शेत जमिनीचा वाद कोणत्या टोकाला जातील कधी काही सांगता येत नाही असाच एक प्रकार वाशी तालुक्यातील शेलगाव येथे घडला आहे वाटणीत भारी जमीन घेतल्याचा राग मनात धरून महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी 7 ऑगस्ट रोजी भावकीतील चौघांवर वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की वाशी तालुक्यातील शेलगाव येथील भैरट कुटुंबात शेत जमिनीची वाटणी पूर्ण झाली होती मात्र एका गटाला यानंतरही समाधान झाले नव्हते भारी जमीन हातून गेल्याचा राग मनात दाटला होता ;त्यातून ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वर्षा भैरट यांना यांना आरोपी सुरेश रामभाऊ भैरट, रामभाऊ तुकाराम भैरट जिजाबाई जगन्नाथ भैरट तिघेही राहणार शेलगाव व तात्यासाहेब दादाराव शिंगटे (राहणार दहिफळ) याने तू भारी वाटणी घेतलीस आणि आम्हाला हलकी वाटणी दिली असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केली तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वर्षा भैरट यांनी दि, ७ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुरेश भैरट रामभाऊ भैरट जिजाबाई भैरट आणि तात्यासाहेब शिंगटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत
0 Comments