नळदुर्ग जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात, 2 ठार तर तिघे जखमी-Naldurg-Solapur-Hyderabad Road Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात, 2 ठार तर तिघे जखमी-Naldurg-Solapur-Hyderabad Road Accident

नळदुर्ग जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात, 2 ठार तर तिघे जखमी-


तुळजापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे : मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 65 वरील नळदुर्ग जवळील साई प्लाझा हॉटेलसमोर आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास एक ट्रक व कारचा भीषण अपघात झाला असुन, या अपघातात दोन ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे

 या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. हैदराबादकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक TS-13-UB-8676 आणि सोलापूरहून कर्नाटककडे जाणारी स्विफ्ट कार क्र-( KA-41-B-2600) यांची साई प्लाझा हॉटेलजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. या कारमधून एकूण पाचजण प्रवास करत होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींमध्ये मल्लोर रामच कल्ला वय (२७)आणि गिरिजाप्पा जगन्नाथ शरणम्मा वय (४०) यांचा समावेश असून, दोघेही गुलबर्गा, कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजते.या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्गचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटात पोहचली नळदुर्ग येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत मॅडम, प्रशांत वाघचैरे, सतीश पवार, सचिन खंडेराव, राजु चव्हाण तसेच पोलिस स्टेशनचे हेडकॉनस्टेबल खलील शेख व विलास चव्हाण आदी  पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. 

Post a Comment

0 Comments