मौजे इटकळ येथे श्री.राम विजय ग्रंथाची मोठ्या उत्साहात सांगता-Balaghatnewstimes
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
गावात ग्रंथ दिंडी काढून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे श्रीधर स्वामी लिखित श्री राम विजय ग्रंथाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे इटकळ येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच श्री राम विजय ग्रंथ वाचन निरूपण सेवेस प्रारंभ करण्यात आला.४० अध्यायाच्या समाप्ती नंतर रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ग्रंथ सांगता करण्यात आली. श्रीराम मंदिरापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ करून हनुमान नगर,मराई चौक, साठे चौक, स्वामी गल्ली, चावडी चौक ते परत श्रीराम मंदिरावर ग्रंथ दिंडी सांगता करण्यात आली. यावेळी रामकृष्ण हरी जय श्रीराम च्या जय घोषाने अवघा परिसर दणाणून गेला. यावेळी रामभक्त दिनेश सलगरे, नागनाथ स्वामी, गणेश बिराजदार, काशिनाथ पांढरे, रितेश माशाळकर, प्रकाश पांढरे, विश्वनाथ गायकवाड, चेतन गायकवाड, व्यंकट पाटील, दत्तात्रय शिंदे यांच्यासह बहुसंख्य रामभक्त महिला व युवक उपस्थित होते.

0 Comments