तलाठ्याचा धक्कादायक प्रताप : पेन्शनच्या फाईलवर सही करण्यासाठी दिव्यांग महिलेला तलाठ्याने मागितली बियर बारचे बिल ! घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जालना जिल्ह्यात खळबळ-
जालना /प्रतिनिधी रूपेश डोलारे : दिव्यांग महिलेच्या पेन्शन अर्जावर सही करण्यासाठी नाजा तालुका भोकरदन येथील तलाठ्याने सदर दिव्यांग महिलेला चक्क बियर बारचे बिल भरण्याची मागणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे .या व्हिडिओमुळे हे तलाठी महाशय सध्या राज्यभर चर्चेत आला आहे या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागाच्या विश्वासाहतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे जनतेतून संतापची लाट उसळली असून संबंधित तलाठ्याचे निलंबनाचा प्रस्ताव तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. एकंदरीत या घटनेकडे पाहता महसूल प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे यातून स्पष्ट होते.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की जयपुर कोठारा येथील एका दिव्यांग महिलेने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेसाठी अर्ज दाखल केला होता संबंधित तलाठ्याची सही मिळवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असतात बारमध्ये दारू ढोसत असलेल्या तलाठ्याने त्यांना चक्क तेथे बोलून बियर मार्च बिल भरण्याची अट घातली सुरुवातीला या महाशयाने अर्जावर सही करून नंतर दारूची बिल न भरल्यामुळे केलेली सही खोडून टाकल्याचा संताप जनक प्रकारे ही घडला हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आणि त्या तलाठ्याने दिव्यांग महिला अर्जदारास थेट बारमध्ये बोलवण्याचा अट्टाहासच धरला या संताप जनक प्रकाराचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे ठरल्याने तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी तातडीने अहवाल सादर करून दारूबाज तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला आहे जिल्हाधिकारी स्तरावरून औपचारिक आदेश देण्यात येणार असून त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments