संतापजनक घटना: पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आरोपीस पाच तासाच्या आत ठोकल्या बेड्या; बीड जिल्ह्यातील घटना, उद्या परळी बंदचे आवाहन-Beed Crime Case News
बीड /प्रतिनिधी रूपेश डोलारे :जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात (Parli Railway Station) अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी (Police) बरकत नगर येथील आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर (pandharpur) येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात परळीत आले होते. रेल्वेने परळीत दाखल झाल्यानंतर वडील काही वेळासाठी स्टेशनच्या बाहेर गेले होते, तर आई रेल्वे स्थानक परिसरातच थांबली होती. त्यांच्यासोबत चार वर्षांची चिमुरडीही होती.
आई आजारी असल्यामुळे ती रेल्वे स्थानकावरच झोपून गेली. या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने संधी साधत बालिकेला जवळील एका ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडित बालिका रडत आईकडे परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
कोल्ड्रिंक चे आमीष दाखवून नेले
चिमुकलीला आरोपीने कोल्ड्रिंकचे आमिष दाखवले त्यामुळे ते हसत खेळत त्याच्यासोबत स्थानकापासून दूर गेली. कोणी नसल्याची संधी साधून याच आरोपीने याच चिमुकलीवर भर दुपारी अत्याचार केला. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी लगेच स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर अवघ्या पाच तासात घरात झोपलेल्या या आरोपीला बेड्या ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध
पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यात एक इसम पीडित बालिकेला सोबत नेताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परळी शहरातील बरकत नगर भागातील संशयित आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज (1 सप्टेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पीडित बालिकेवर उपचार सुरू
घटनेनंतर पीडित बालिकेला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
पीडित कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील
पीडित कुटुंब हे सोलापूर जिल्ह्यातील आहे मजुरी करून ते पोट भरतात या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे शनिवारी रात्री दहा वाजता पंढरपूर मधून रेल्वेने ते रविवारी सकाळी साडेअकरा वाजता परळीत आले होते तेथेच सर्दी खोकल्याच्या गोळ्या खाऊन ते झोपले होते पती थोडी बाजूला गेली होती तर आईला झोप लागली होती हीच संधी साधून नराधमाने चिमुकलेला अमिषा दाखवून दूर नेते तिच्यावर अत्याचार केला.
आरोपी परळी चा पण परभणी जिल्ह्यात सासरवाडीत
शेख सज्जन अलाबकस( वय 27 राहणार जमजम कॉलनी परळी हंगामी मुक्काम परभणी) असे नराधम आरोपीचे नाव आहे तो दारू पिण्याच्या सवयीचा आहे तो जरी मूळचा परळीचा असला तरी त्याची सासरवाडी परभणी जिल्ह्यात आहे आणि तो तिकडेच राहतो पाच दिवसांपूर्वी तो परळीत आला होता तो बांधकाम कामगार असल्याचे सांगण्यात आली आहे.
चिमुकलीला झुडपात सोडून आरोपी फरार
रेल्वे स्थानकातून झुडपात चिमुकलीवर अत्याचार केला त्यानंतर तिला तेथेच सोडून तो फरार झाला इकडे आई आजाराने आणि प्रवासाने थकल्याने झोपलेलीच होती मुलगी रडत आल्यानंतर आई उठली आणि तिने आरडाओरडा केला त्यानंतर इतर प्रवासी जमा झाले त्यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क केला रेल्वेने संभाजीनगर पोलिसांना संपर्क केल्यानंतर मुलीला परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिथून अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात पाठवले दरम्यान आरोपीने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का हे देखील तपासात उघड होणार आहे.

0 Comments