तुळजापूर तालुक्यातील बोरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिके यांचे मोठे नुकसान,येथील विकास हावळे यांचे अडीच एकर सोयाबीन पाण्यात

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील बोरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिके यांचे मोठे नुकसान,येथील विकास हावळे यांचे अडीच एकर सोयाबीन पाण्यात

तुळजापूर तालुक्यातील बोरी परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे  मोठे नुकसान,येथील विकास हावळे यांचे अडीच एकर सोयाबीन पिकाला तळ्याचे स्वरूप 


तुळजापूर प्रतिनिधी /रूपेश डोलारे :  जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवसापासून ढगफुटी सदस्य पावसाने हाहाकार  उडाला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व पिके पाण्यात गेल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीपातील पिकांचे होत्याचे  नव्हते झाले आहे झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. झालेल्या नुकसानाची तात्काळ सरसकट पंचनामे मदत करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या अतिवृष्टी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील बोरी येथील शेतकरी विकास हावळे यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील काढणीस आलेल्या सोयाबीन पिकामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने सोयाबीन पिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघतो का नाही? असा प्रश्न शेतकरी हावळे यांना पडला आहे. एकंदरीत या मुसळधार पावसाने परिसरातील शेती पिकांचे मोठे प्रमाण झाले आहे  सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.

Post a Comment

0 Comments