शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वी घाटशिळ रोड दुरुस्ती व शहरातील भक्ताच्या सुविधांचे सर्व कामे करण्यात यावे - मानअधिकार जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे; या अनुषंगाने मानअधिकार जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव श्रीकांत वाघे यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्यापूर्वी घाटशिळ रोड दुरुस्ती व दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे सुविधांचे सर्व कामे तातडीने करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, घाटशीळ मंदिर रस्ता एमटीडीसी डांबरीकरण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर बार्शी 50 किलोमीटर अंतरावरुन  पायी चालत आलेल्या भाविकांच्य नातूक झालेल्या पायांना खडे टोचून वेदना होतात, शहरातील विविध ठिकाणच्या मोकळ्या जागेत शे-पाचशे लोक पावसाच्या आश्रय घेतील असे दहा ते पंधरा निवारे उभारणे, त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने मोबाईल टॉयलेट व स्नानगृहाची व्यवस्था करून देणे व हिरकणी कक्ष तयार करणे, या सर्व सुविधा शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये भाविक भक्तांना पुरविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उत्तम अमृतराव, रवींद्र साळुंखे, कुमार पांढरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments