नळदुर्ग : महाराष्ट्र सेट परीक्षेत रूपाली मनोज बनसोडे यांचे घवघवीत यश
नळदुर्ग/ प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : महाराष्ट्र सेट सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत नळदृग येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी रूपाली मनोज बनसोडे यांनी हिंदी विषयात घवघवीत यश संपादन केली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. नळदृग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये बनसोडे रूपाली मनोज (हिंदी) नकाते सोनाली सुरेश (भौतिकशास्त्र) पवार संगीता (प्राणीशास्त्र) पवार विकास शंकर (इतिहास) या यशस्वी विद्यार्थ्यांनी फुले विद्यापीठाकडून जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेत यश मिळवले या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments