धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात पुन्हा वाघाचे दर्शन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात पुन्हा वाघाचे दर्शन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात पुन्हा वाघाचे दर्शन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : मागील सहा महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघ बिबट्या या हिंस्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे, मात्र या प्राण्याला पकडण्यात अद्याप पर्यंत वन विभागाला यश आलेली दिसून येत नाही त्यातच आता मागील चार दिवसांपूर्वी धाराशिव तालुक्यातील वरवंटी कामठा शिवारात वाघाचे दर्शन झाल्याचा नवा व्हिडिओ समोर आला होता आता पुन्हा आज वरवंटी शिवारात दुसऱ्यांदा वाघाचे दर्शन झाल्याचे दिसून आली आहे त्यामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत पुन्हा एकदा वाढली असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वरवंटी शिवारातील दुसऱ्या व्हिडिओ चीत्रीकरणांमध्ये एक शेतकरी धाडस दाखवत वाघाला पिटाळून लावत असल्याचे दिसत आहे, त्यानंतर वाघ उसाच्या शेतात शिरला. शेतकरी वाघाच्या मागे मोठमोठ्याने ओरडत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत समोर आले आहे. त्यानंतर वाघ जवळच्या शेतामध्ये शिरला मात्र असा प्रयत्न शेतकऱ्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार धाराशिव तुळजापूर तालुक्यामध्ये वाघ बिबट्या या हिंस्र प्राण्याने पाळीव प्राण्यावर हल्ले केले आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे वन विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून पिंजरा लावुन वाघाला पकडुन सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाघाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.facebook.com/share/v/19j5o6wRA8/



Post a Comment

0 Comments