अणदूर येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण चार जणांवरुद्ध गुन्हा दाखल-Andur Crime New Balaghatnewstimes

Hot Posts

6/recent/ticker-posts

अणदूर येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण चार जणांवरुद्ध गुन्हा दाखल-Andur Crime New Balaghatnewstimes

अणदूर  येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण चार जणांवरुद्ध गुन्हा दाखल-


धाराशिव प्रतिनिधी/ रुपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर  येथे शेतीच्या वादातून एकास बेदम लाथाबुक्यांनी  मारहाण करून गंभीर जखमी केले आहे याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघाजणाविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील अंतर शिवारात दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रदीप शिवाजी घुगे वय 50 राहणार अनदुर यांना जमिनीच्या वादातून आरोपी अभिषेक उत्तम घुगे महेश उद्धव घुगे नंदाबाई उत्तम घुगे आणि मंगल उद्धव घुगे सर्व राहणारा अणदूर  यांनी संगणमत करून प्रदीप घुगे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले याप्रकरणी फिर्यादी प्रदीप घुगे दिनांक 4 सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली यावरून पोलिसांनी आरोपी एकाच कुटुंबातील चौघाजणाविरुद्ध  नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109 सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments