श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजमध्ये गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर राऊत यांचे व्याख्यान संपन्न

Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजमध्ये गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर राऊत यांचे व्याख्यान संपन्न

श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजमध्ये गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर राऊत यांचे व्याख्यान संपन्न


धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे आज गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा. ज्ञानेश्वर राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या विशेष प्रसंगी आपल्या प्रभावी भाषणशैलीतून श्री. राऊत यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी देशभक्ती, संस्कार आणि संस्कृतीचे महत्व पटवून दिले. शिक्षण घेताना आपल्या आई-वडिलांचे कष्ट लक्षात ठेवून अभ्यास करावा, तसेच ज्ञानाच्या विविध शाखा आत्मसात कराव्यात असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आपले ज्ञान केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून, ते समाजहित, देशहित आणि देशकल्याणासाठी समर्पित व्हावे, यावरही त्यांनी भर दिला. व्याख्यानादरम्यान त्यांनी कवितेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. गरिबीची जाणीव ठेवून, त्यातून शिकत पुढे जाण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. २१ वे शतक हे ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी विविध विषयांमधून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील यांची खास उपस्थिती लाभली. यावेळी कला व वाणिज्य शाखेचे पर्यवेक्षक श्री. के. के. कोरके, फिजिक्सवाला विभाग प्रमुख श्री. ए. व्ही. भगत, फेनॉमेनॉल बॅचचे प्रमुख श्री. एस. एस. सदाफुले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. वाय. घोडके यांनी केले तर आभार उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आदींचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments