लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल उमरगा तालुक्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : उमरगा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने 11 नोव्हेंबर 2024 रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला एवढेच नाही तर आरोपीने पिडीतीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्यादीत नमूद केली आहे. या घडलेल्या प्रकारानंतर पिडीतेच्या आईने 1 सप्टेंबर 2025 रोजी उमरगा पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली पीडित आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 49 64 64 2 64 (2)(एम) नियम 351 (3) 352 तसेच पोस्को कायद्याची कलम 4, 8 आणि 12 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

0 Comments