पंतप्रधान धन्य कृषी योजनेत 9 जिल्हे शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार मदत-Pantpradhan Dhandhanya Krashi Yojna

Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधान धन्य कृषी योजनेत 9 जिल्हे शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार मदत-Pantpradhan Dhandhanya Krashi Yojna

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश  शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार मदत-


मुंबई /प्रतिनिधी रूपेश डोलारे : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान धन-धान्य  कृषी योजना(PMDDKY) जाहीर करण्यात आली आहे या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले कमी सिंचन क्षमता असलेले कृषी कर्जाची उपलब्ध बाबत समस्या असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्रातील पालघर, रायगड ,धुळे ,छत्रपतीसंभाजीनगर, बीड ,नांदेड यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे .शेतीत सुधारणा उत्पादन वाढ पीक विविधकरण आणि शाश्वत शेतीला चालना या योजनेद्वारे दिली जाणार आहे..

शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे आता केंद्र सरकार कमी उत्पादन असलेल्या व सिंचन क्षमता नसलेल्या देशातील आकांक्षीत १०० जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धन्य कृषी योजना शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत सुरू होणार आहे .शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील सहा वर्षे योजना राबवण्यात येणार  असून  या योजनेअंतर्गत दरवर्षी 24 हजार कोटींचा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निवडलेल्या जिल्ह्यामध्ये धनधान्य साठवून प्रक्रिया सिंचन सुधारणा तसेच पातळीवरील रोजगार निर्मिती यावर भर दिला जाणार आहे.

पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ दिल्लीत करतील तर महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडणार आहे या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतशील कामगिरी करणारे 300 हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत.

कृषिमंत्र्याकडून मोदी ,शिवराजसिंह यांचे आभार

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या नव्या योजनेबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वागत करत महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित उपक्रमांतर्गत अकरा विभागाच्या 36 योजना एकत्रित राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments