मौजे येवती येथील कुमारी अंजली तांबे यांचे मोडी लिपी परीक्षेत घवघवीत यश.
"""""''''''''''""""""""""""""""""""'"'""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांचे मार्फत व्हि.जी शिवदारे कॉलेज सोलापूर येथे आयोजित मोडी प्रशिक्षण वर्गाची २० सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोडी परीक्षेत अंजली तांबे हिने उत्कृष्ट गुण मिळवत यश संपादन केले आहे. ती सध्या बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग येथे बारावी वर्गात शिक्षण घेत आहे.या प्रशिक्षणामुळे ऐतिहासिक मोडी लिपी कागदपत्रांचे, शिलालेखांचे वाचन व त्याचा सर्वांना, विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा. तसेच इतिहासप्रेमी व शासकीय कार्यालयातील कर्मचारी वर्ग यांना शासकीय कार्यालयातील कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी मदत होणार असून मला केवळ लिपीची अक्षरं शिकायला मिळाली नाहीत, तर हिंदवी स्वराज्याच्या गुप्त दालनांची किल्ली हातात मिळाली. इ.स. १३ व्या शतकापासून १९६० पर्यंत महाराष्ट्राच्या प्रशासन, न्याय,करप्रणाली आणि व्यापाराचे खरे दस्तऐवज मोडी लिपीत लिहिले गेले.यादव,बहामनी, निजामशाही,आदिलशाही यांच्यापासून मुघलांपर्यंत सर्वांनी मोडीचा वापर केला.पण खरी सुवर्णकाळाची सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारात. स्वराज्याचे दप्तरे, हुकुमनामे, महसूल नोंदी,आणि आज्ञापत्रे या सर्वांचा ठसा आजही मोडी लिपीत दडलेला आहे तो जनतेसमोर आणणार असल्याचे अंजली तांबे यांनी सांगितले.

0 Comments