बीड :शेतीच्या वादातून एकाचा खून; एक जण गंभीर जखमी सहा आरोपींना दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या-
बीड/प्रतिनिधी रूपेश डोलारे : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील लोणी सय्यद येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे खून झालेल्या छबू देवकर वय (72) राहणार लोणी सय्यद मीर तालुका आष्टी जिल्हा बीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत मयताचा मुलगा मिठू छबू देवकर गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील सय्यद मीर लोणी येथे देवकर कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जमिनीचा वाद सुरू आहे शनिवारी दिनांक 12 रोजी सायंकाळच्या सुमारास लहान मुले चेंडू खेळण्याच्या वादातून हा वाद पुन्हा उफाळला या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या मारहाणीत मध्ये छबू देवकर यांना गंभीर मार लागला त्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेत तपासाची चक्री फिरवत दोन टीम तयार करून रामदास देवकर, संतोष देवकर, राहुल देवकर, कविता देवकर, मनीषा देवकर ,लता देवकर (सर्व राहणार लोणी सय्यद मीर ता. आष्टी )यांना ताब्यात घेतली आहे दरम्यान लोणी गावांमध्ये तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवे हे करत आहेत.

0 Comments