शारदीय नवरात्र महोत्सव: श्री तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना विधी संपन्न-Tuljabhavani Shardiy Navratra Mahostav
तुळजापुर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आज (बुधवार) पारंपरिक पद्धतीने घटोत्थापना विधी संपन्न झाला. २२ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्रातील नवमाळेपर्यंतच्या पूजा-अर्चना, होम-हवन, देवीचे विविध अलंकार सोहळे पार पडले, यानंतर आज धार्मिक विधीपूर्वक घट उठविण्यात आला.
घट उठविताना उपस्थित भाविकांनी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. या तहसीलदार तथा (व्यवस्थापक) प्रशासन माया माने व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, उद्या विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मंदिर परिसरात मंदिर संस्थान व प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.

0 Comments