शेत जमिनीच्या वादातून महिलेस मारहाण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; उमरगा तालुक्यातील घटना-Umerga Crime News Daily
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे: उमरगा तालुक्यातील तुरोरी शिवारात जमिनीच्या वादातून महिलेस शिवीगाळ करून लाथा बुक्क्या विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी दिनांक 18 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादी महिला शकुंतला उर्फ सखुबाई बालाजी माने वय (47)राहणार तुरोरी तालुका उमरगा हल्ली राहणार जहांगीर चिंचोली असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे .या दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी तुरोरी शिवारातील शेत गट नंबर 106 / 2/2 मध्ये होत्या यावेळी आरोपी राणी पप्पू बिराजदार ,श्याम उर्फ उमा पप्पू बिराजदार दोघे (राहणार मुळज तालुका उमरगा) जनाबाई एकनाथ जाधव, एकनाथ बनारस जाधव, ज्ञानेश्वर एकनाथ जाधव, पंढरी लिंबन्ना आप्पा दुधनाळे ,अशोक श्रीपती जाधव राहणार तुरोरी यांनी त्यांना जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत लाथा बुक्क्या विळ्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यामध्ये संबंधित सात आरोपी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उमरगा पोलीस करत आहेत.

0 Comments