🚨ब्रेकिंग..... उमरगा तालुक्यातील दाळींब जवळ दोन वाहनांचा भिषण अपघात.... चार जण ठार,तर दोघे गंभीर जखमी.
धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे :धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद मार्गावरील दाळिंब गावाजवळ दोन महागड्या अलिशान कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कार वेगात होती त्याचवेळी अचानक रस्त्यावर कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर हा अपघात झाला. दोन वाहनांच्या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ऐन दिवाळी सणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सफारी गाडी चालवत असताना अचानक रस्त्यावर एक कुत्रा आला. त्यावेळी चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवरील नियंत्रण सुटल्याने सफारी गाडीने डिव्हायडर ओलांडला. यामुळे कार ही विरुद्ध लेनमध्ये शिरली. त्याचवेली समोरून येणाऱ्या ग्रँड विटारा गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिकांसह इतरांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मदत कार्याला वेग आला.या दुर्घटनेत बिदर (कर्नाटक) येथील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सोलापूर येथील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्ती खासमपूर (बिदर) येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

0 Comments