पुणे : भोंदूबाबाचा पुण्यातील संगणक अभियंत्याला 14 कोटींचा गंडा, जादूटोण्याने मुलीचे आजारपण दूर करण्याचा बहाना, इंग्लंड मधील घरदार विकण्याची ओढवली नामुष्की-
पुणे : दुर्धर विकार आणि ग्रासलेल्या मुलींचे आजारपण जादूटोण्याच्या साह्याने दूर करण्याचे आमीष दाखवून एका भोंदू बाबांनी कोथरूड मधील संगणक अभियंता व त्याच्या पत्नीची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. भोंदू बाबाच्या जाचामुळे या अभियंत्याला पुण्यातील कोथरूड तसेच इंग्लंडमधील कोठ्यावधीचे घर, शेतजमीन विकण्याची नामुष्की ओढवली आहे.
फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीने पोलीस आयुक्तालयात अर्ज दिला असून अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार संगणक अभियंता कोथरूड मधील एका उच्चभू सोसायटीत राहिला आहेत ते एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. पत्नी दोन मुलींसाठी कोथरूडमध्ये वास्तव्याला आहेत त्यांची एक मुलगी गतिमंद असून दुसऱ्या मुलीला दुर्धर आजाराने ग्रासले आहे आर्थिक बाजू चांगली असताना दोन मुलींची प्रकृती चांगली नसल्याचे खंत संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीला होती.
हे दांपत्य 2018 पासून भजनी मंडळात जायचे भजनी मंडळातील नागरिकांना त्यांच्या मुलीच्या आजारपणाविषयी माहिती होती त्यांनी संगणक अभियंताची दीपक खडके नावाच्या एका व्यक्तीशी ओळख करून दिली.त्यानंतर दीपक खडके यांनी वेदिका कुणाल पंढरपूरकरांनी तिचे पती कुणाल यांच्याशी ओळख करून दिली.वेदिक काही एका बाबाची लेक आहे तिच्या अंगात बाबाचा संचार होतो असे खडके यांनी संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीला सांगितले. वेदिका तुमच्यावरील सर्व संकटे दूर करतील असे त्यांना सांगण्यात आले त्यानंतर वेदिकांनी संगणक अभियंत्यांची संपूर्ण माहिती घेतल तिच्या संपत्तीत परिस्थितीची माहिती तिने घेतली त्यानंतर वेदिकांनी दोन मुलींना घेऊन दीपक खडके यांच्या दरबारात बोलवले त्यावेळी तिने अंगात संचार आल्याचा बहाना केला. त्यानंतर अनेकदा अंगात संचार आल्याचा बहाना करून 2019 ते 2021 या कालावधीत त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले, तुम्ही तुमच्या खात्यात पैसे ठेवू नका असे सांगून तिने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले संगणक अभियंत्याने बँकेतील ठेवी मोडून तिच्या खात्यात पैसे जमा केले.
घरातील दोषामुळे मुली बऱ्या होत नसल्याची थाप
मुलींचा आजार गंभीर असून आजार बरा होण्यास वेळ लागेल असे सांगितले त्यानंतर मुली बऱ्या न झाल्याने संगणक अभियंत्याने विचारणा केली तेव्हा तुमच्या घरात दोष आहे घरातील दोषामुळे मुली बरे होत नसल्याचे सांगितले तुम्ही घर विक्री करा ही रक्कम तुमच्याकडे ठेवू नका ही रक्कम आमच्या खात्यात जमा करा. ही रक्कम घरात ठेवल्यास कोणाचाही मृत्यू होऊ शकतो असे बाबांनी आम्हाला सांगितले आहे असे तिने त्यांना सांगितले त्यामुळे 2022 मध्ये त्यांनी कोथरूड मधील घराची विक्री केली ही रक्कम तिच्या खात्यात जमा करण्यात आली.
पॉलिसीत गुंतवलेली रक्कमही काढून दिली
बाबा दर्शन घेणार आहेत असे सांगून तिने संगणक अभियंत्याला इंग्लड मधील घर विक्री करण्यास सांगितले. संगणक अभियंता राहत असलेले आणखी एक सदनिका, शेत जमिनीतून दोष असल्याचे सांगितले त्यानुसार त्यांनी कोथरूड मधील आणखी एक सदनिका इंग्लंडमधील घर शेत जमिनीची विक्री केली .पॉलिसीत गुंतवलेली रक्कम त्यांनी तिला दिले त्यानंतर आणखी रक्कम मागितली. मुली बऱ्या होतील या आशेने त्यांनी भावाचे घर तारण ठेऊन पैसे दिले .गेल्या सात वर्षात वेदिका तिचा पती आणि साथीदारांनी कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याची लक्षात आल्यानंतर संगणक अभियंत्याने पोलीस आयुक्तालयात नुकताच तक्रार अर्ज दिला आहे.

0 Comments