आलूर येथील शुभम क्षीरसागर याची महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघात निवड .

Hot Posts

6/recent/ticker-posts

आलूर येथील शुभम क्षीरसागर याची महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघात निवड .

आलूर येथील शुभम क्षीरसागर याची महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघात निवड .


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

आलूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा...!!!

-------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे आलुर येथील शुभम क्षीरसागर यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या अंडर 19 व्हालिबॉल संघात त्यास स्थान मिळाले आहे.भविष्यात भारतातील वेगवेगळ्या राज्यातील संघासोबत त्याला खेळता येणार आहे.शुभम क्षीरसागर यांच्या निवडीचे गावातील विविध स्थरातुन कौतुक होत आहे.आलुर येथे गेल्या सहा वर्षांपासून  राज्यस्तरीय ग्रामीण व शहरी व्हॉलिबॉल स्पर्धा भरविण्यात येतात.यामुळे नविन खेळाडुंना यापासुन प्रेरणा मिळते.सराव करण्यासाठी आलुर येथील पौष ॲग्रो सर्व्हीसेसचे अविनाश मुळजे,विकास मुळजे व व्हॉलीबॉलप्रेमी बसवराज मुनाळे,बाबा जेवळे आलुर वॉरियर्स व्हॉलीबॉल संघाच्या वतीने मैदान व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे खेळाडूंना मोठे यश मिळवण्यासाठी मदत होते.महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष दादा सर देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला महाराष्ट्र संघात स्थान मिळाले असे मत शुभम क्षीरसागर याने मांडले.शुभम क्षीरसागर यांचे आलुर वॉरियर्स संघ व तमाम व्हॉली बॉलप्रेमी लोकांतर्फे व गावातील नागरीकांतर्फे महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments