धाराशिव चेक व बाॅंड देण्याच्या बहाण्याने एका 43 वर्षीय महिलेवर लैंगिक; अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील एका गावात एका एका 43 वर्षीय महिलेवर चेक व बाॅंड देण्याचा पाहण्याने आपल्या कारमध्ये बसवून नेत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 अन्वे १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, ही घटना 15 नोव्हेंबरला सकाळी अंदाजे साडेदहा ते 12 या दरम्यानच्या वेळेत घडली आहे. गावातीलच एका तरुणाने एका 43वर्षीय महिलेला संपर्क साधला आणि त्याने तिला काही महत्त्वाचे चेक व बाॅंड द्यायचे आहेत.असे सांगून कार मध्ये बसवले: पीडित महिला विश्वास ठेवून कार मध्ये बसल्यानंतर संबंधीत तरुणाने प्रत्यक्षात तिला चेक व बाॅंड न देता अज्ञात ठिकाणी लिहून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर तात्काळ पीडित महिलेने तुळजापूर पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली. संबंधित पीडित महिलेच्या तक्रारी वरून घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच दिवशी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलिसांनी तरुणाविरुद्ध भारतीय संहिता कलम 64 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments