अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन,88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व हरपले-
अक्कलकोट / प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे जेष्ठ नेते खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा मलकप्पा पाटील यांचे गुरुवारी दिनांक 13 रोजी रात्री अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर मूळ व्हावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे आज शुक्रवारी दिनांक 14 रोजी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .
सिद्रामप्पा पाटील प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपची बांधणी केली इतकच नाही तर तालुका भाजपमय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्य जन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसेच मोठा आधार देणार होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारे खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली. गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालक एक वेळ उपाध्यक्ष व श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती ,तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा राजकीय प्रवास होता.
वयाच्या 87 वर्षापर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं गेल्या काही दिवसापासून त्यांना आजारांन ग्रासले होत दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक 13 रोजी रात्री आठ वाजून 17 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजतात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

0 Comments