विवाहित प्रेयसीचा रॉकेल ओतून पेटवून खून; आरोपी प्रियकरास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashi District Court Judgement Accuse Imprisement

Hot Posts

6/recent/ticker-posts

विवाहित प्रेयसीचा रॉकेल ओतून पेटवून खून; आरोपी प्रियकरास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashi District Court Judgement Accuse Imprisement

विवाहित प्रेयसीचा रॉकेल ओतून पेटवून खून; आरोपी प्रियकरास  १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-


धाराशिदिले /प्रतिनिधी रूपेश डोलारे  : प्रेम संबंधातून शारीरिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरून आरोपीने महिलेस अंगावर राकुल ओतून पेटवून दिल्याप्रकरणी दहा वर्षे सत्ता मजुरीची शिक्ष व 45 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला हा न्याय निर्णय धाराशिव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.ए.डी. देव  यांनी  आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे यास दोषी ठरवून दिला. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणात अभियोग पक्षाचे कामकाज पाहिले.

याबाबत जिल्हा सरकारी वकीला कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीची पत्नी व आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे हे किराणा दुकानात साहित्य नेण्यासाठी येत जात असताना दोघांमध्ये ओळख निर्माण होऊन त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाली होते. यातूनच दोघे एकमेकांना फोन द्वारे बोलत व भेटत होते दरम्यान 10 ऑगस्ट 2017 रोजी मयत महिला ही घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरात आला व त्याने शरीर सुखाची मागणी केली परंतु यास महिलेने विरोध केल्यानंतर संतापलेल्या आरोपीने घरातील कॅण्डल मधील रॉकेल महिलेच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले उपचारादरम्यान महिलेने आरोपीने पतीवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने आपण अपघातात जखमी झाल्याचे सांगितले; परंतु पतीने विचारणा केल्यानंतर आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे यांनी रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले यावरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 302, 452, 506 अन्वये गुन्हा नोंद  करण्यात आला तसेच आरोपीच्या तपासणीतही  त्यालाही भाजल्याच्या जखमा दिसून आल्या त्यानुसार आरोपीविरुद्ध न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक एस.एल. दराडे यांनी दोषारोप पत्र सादर केले प्रकरणाच्या सुनावणीत समोर आलेला पुरावा साक्षी तसेच सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अभियोग्यता ऍडव्होकेट महिंद्र देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.डी. देव यांनी आरोपी विष्णू लोंढे यास 10 वर्षे सक्तमजुरी व 45 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

11 जणांची नोंदविण्यात आली साक्ष

सदरील खटला न्यायालयासमोर उभा राहिल्यानंतर सरकारी वकील महेंद्र बी देशमुख यांच्याकडून जवळपास 11 जणांची साक्षी नोंदवून जोरदार युक्तिवादही करण्यात आला तसेच सदरील युक्तिवाद आणि समोर आलेले पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सत्ता मजूर यांनी दंड अशी शिक्षा ठोठावली.

Post a Comment

0 Comments