खळबळजनक : लैंगिकतेवर चिडवण्याचे कारणावरुन परप्रांतीय मजुराचा खुन धाराशिव जिल्ह्यातील घटना -
धाराशिव : स्ट्रोन क्रेशर वर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराचा लैंगिक तेवर चिडवण्याच्या कारणावरून एका मजुराचा दुसऱ्या मजुराने लोखंडी पाईपाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील वाघोली शिवारात गुरुवारी दि,२० रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील वाघोली शिवारात अजमेरा ड्रोन केशन आहे,या स्ट्रॉंग क्रेशरवर झारखंड राज्यातील काही मजूर काम करतात व तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत . यामध्ये आरोपी नामे-सुमितकुमार सत्येंद्र सिंग, (रा. उपर हटिया पिठ्याटोली ता. जगन्नाथपुर जि. रांची झारखंड ह.मु.डि सी अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली ता. जि. धाराशिव) यांनी गुरुवारी दि.20 रोजी 03.30 वा. सु. वाघोली शिवारातील अजमेरा यांचे खडी क्रेशरवरील मजुरांचे राहते पत्र्याचे शेडमध्ये मयत सुनिल गांगु कुजुर, (रा. उपर हाटीया पिठ्याटोली ता. जगन्नाथपुर जि. रांची झारखंड ह.मु.डि सी अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली ता. जि. धाराशिव) यांना नमुद आरोपीने लैंगिकतेवर चिडवण्याचे कारणावरुन डोक्यात चौकोणी लोखंडी पाईपाने मारहाण करुन जिवे ठार मारले. व जखमी नामे- धनेश खासा मुंडा, रा. उपर हाटीया पिठ्याटोली ता. जगन्नाथपुर जि. रांची झारखंड ह.मु.डि सी अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली ता. जि. धाराशिव यांना चौकणी लोखंडी पाईप मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी नामे- मागन करोम लोहरा, वय 67 वर्षे, रा. पुर्णानगर आडकी जि. खुटी ह.मु. उपर हाटीया पिठ्याटोली ता. जगन्नाथपुर जि. रांची झारखंड ह.मु.डि सी अजमेरा स्टोन क्रेशर, वाघोली ता. जि. धाराशिव यांना ही मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मागन लोहरा यांनी दि.20.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 103(1),109(1), 118(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments