सोलापूर : अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणातील आरोपातील आरोपीस जामीन मंजूर -
सोलापूर प्रतिनिधी: अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याचे आरोपातील आरोपी विवेक ढगे यांची सोलापूर सत्र न्यायाधीश श्री.डी.एन. सुरवसे यांनी 50 हजार रुपयाच्या सशर्त जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे दि,6 रोजी आदेश दिले.
यात घटनेची हकीगत अशी की, दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी विवेक यांनी पिडीतेला बोलवून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून तिला मोटरसायकलवर बसून लॉजवर घेऊन जाऊन पिडीतेच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केले असल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) (i) 64 (2)M 137 (2) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 3 (1) (w) (i) (3)(1) (w) (ii) 3 2 (va) व लैंगिक गुन्हापासुन बालकाचे संरक्षण(Posco Act) कायदा 2012 अंतर्गत कलम 4-8 व 12 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता .सदर कामी आरोपीविरूध्द सोलापूर येथील मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी व पीडित यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहे तसेच पीडित व आरोपी हे वारंवार एकमेकांशी फोन द्वारे संवाद साधत असल्याचे बाजू मांडून न्यायालयाच्या पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सदरची तथाकथित कृत्य हे पीडित व आरोपी यांच्या प्रेम संबंधातून झाले आहे. सदर आरोपीच्या वकिलाचा भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून निर्माण न्यायालयाने आरोपी यांच्या रक्कम 50 हजार रुपये इतक्या रकमेच्या जामीनावर मुक्तता केलेली आहे यात आरोपीच्या वतीने अॅड. श्रीशैल शरणाप्पा रायचूरकर अॅड.एम.व्ही. फुलमाळी अॅड. मनोज नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले.

0 Comments