धाराशिव : खून प्रकरणी मुलास जन्म कारावासाची शिक्षा, कळंब न्यायालयाचा निकाल -Murder Crime Judgment Kalanb Court Dharashiv
धाराशिव : बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी जमीन विकली या रागातून पित्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलास आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड याप्रमाणे कळंब अतिरिक्त सत्र न्यायाने शिक्षा ठोठावली आहे. कळंब येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निकाल सुनावल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एडवोकेट आशिष कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब- तालुक्यातील कोथळा येथील सागर शिंदे वय 21 हा वडिलांनी मुलींच्या लग्नाकरता शेत विक्री केली व वडील व्यसनी असल्याच्या कारणावरून सतत भांडण करीत होता यातूनच 28 मार्च 2022 रोजी रात्री सात ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान कोथळा शिवारात सागर शिंदे व त्याचे वडील अच्युत भागवत शिंदे यांच्यामध्ये भांडण झाले; त्यामध्ये आरोपी सागर यांनी त्याची वडील अच्युत शिंदे यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड दगड व लोखंडी रोडने मारहाण करून गंभीर जखमी केली तसेच जीवे ठार मारले .त्यानंतर मयत अच्युत यास दोन पायास धरून शेतात ओढत नेऊन बैलगाडी मध्ये टाकून घेऊन जात असताना मिळून आला याप्रकरणी सागर शिंदे यांच्या विरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पत्र दाखल केले. या प्रकरणाचे सुनावणी सत्र न्यायाधीश आर .के . राजेभोसले यांच्या न्यायालयात झाली यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आली. यामध्ये फिर्यादी प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल ,तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एडवोकेट आशिष प्रकरणी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सागर यास भारतीय दंड विधान संहिता कलम 302 प्रमाणे आजन्म करावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

0 Comments