शेतात जनावरे सोडल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण मुरूम पोलीस ठाण्यात तिन जणाविरुद्ध गुन्हा दाखल-Murum Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतात जनावरे सोडल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण मुरूम पोलीस ठाण्यात तिन जणाविरुद्ध गुन्हा दाखल-Murum Police Station Crime News

शेतात जनावरे सोडल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण मुरूम पोलीस ठाण्यात तिन जणाविरुद्ध  गुन्हा दाखल-


धाराशिव/प्रतिनिधी/ रूपेश डोलारे  : शेतात जनावरे सोडल्याच्या किरकोळ कारणावरून तीन आरोपींनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक १ नोव्हेंबर रोजी उमरगा तालुक्यातील वरनाळवाडी शिवारात घडली या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात तिघा आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी शेख फरीद रसूलसाब  (रा. निरगुडी तालुका आळंदी जिल्हा कलबुर्गी कर्नाटक) यांनी मुरूम पोलिसात फिर्यादी दिली आहे फिर्यादीनुसार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शांतेश्वर मठाचे वरनाळवाडी शिवारात शेत गट नंबर १०७ येथे त्यांनी आरोपींना तुम्ही माझ्या शेतात जनावरे का सोडली असे विचारले यावरून आरोपी गुरुनाथ नागप्पा हिरापुरे, गंगाराम कोंडीबा पात्रे दोघे राहणार निरगुडी आणि श्रीकांत मधुकर घोडके रा. आलूर तालुका उमरगा यांनी संतप्त होऊन शेख फरीद यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी दगडाने मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली; शेख फरीद याचे फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) ,115 (2), 352 351 (2),3  (5) सह शस्ञ अधिनियम कलम 4, २५ आणि गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास म्हणून पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments