शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 17 नोव्हेंबर च्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :शिक्षकेत्तर सेवक संघाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव लोहार, व पांडुरंग घोडके यांचे आवाहन

Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 17 नोव्हेंबर च्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :शिक्षकेत्तर सेवक संघाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव लोहार, व पांडुरंग घोडके यांचे आवाहन

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबर च्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :शिक्षकेत्तर सेवक संघाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष  ज्ञानदेव लोहार, व पांडुरंग घोडके यांचे आवाहन 



तुळजापूर/प्रतिनिधी राजगुरु साखरे  : राज्यातील माध्यमिक शिक्षकेत्तर   कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षे प्रलंबित मागण्यासाठी व न्यायालयीन आदेशानुसार सुरू करण्यात आलेली शिक्षकेत्तर   कर्मचाऱ्यांची पद भरती शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून बंद केली असल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सोमवारी दिनांक 17 नोव्हेंबरला पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती  धाराशिव जिल्हा खाजगी उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षकेत्तर  सेवक संघ कर्मचारी तुळजापूर तालुका उपाध्यक्ष सेवक प्रतिनिधी पांडुरंग लिंबाजी घोडके व ज्ञानदेव अनुरथ लोहार यांनी दिली आहे.

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यासाठी मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित आहेत. माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी पद भरती तात्काळ सुरू करण्यात यावी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 24 वर्षानंतर मिळणाऱ्या लाभानुसार त्यांची वेतन निश्चित करताना एस 4 मध्ये न करता एस 5 मध्येच करण्यात यावी. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा 10/20 /30 वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा.

माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षण पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी. माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर   कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या 24 वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा यासह अनेक मागण्या आहेत. या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षकेत्तर   सेवक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ दहिफळे सरकार्यवाह अजितकुमार काळे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील  उपाध्यक्ष ज्ञानदेव घोडके व तालुका उपाध्यक्ष सेवक प्रतिनिधी पांडुरंग घोडके,आदिने केली आहे. ब्युरो रिपोर्ट बालाघाट न्यूज टाइम्स तुळजापूर धाराशिव 

Post a Comment

0 Comments