जळकोट येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा, ४० हजार रुपये च्या वादातून शेजारणीने केला खुन- स्थानिक पुणे शाखेची धडाकेबाज कामगिरी-Tuljapur-Jalkot Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

जळकोट येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा, ४० हजार रुपये च्या वादातून शेजारणीने केला खुन- स्थानिक पुणे शाखेची धडाकेबाज कामगिरी-Tuljapur-Jalkot Murder Crime News

जळकोट येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा, उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून शेजारणीनेच केला खुन- स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी-


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील वृद्ध महिलेचा तिच्या राहत्या घरी दिनांक 21 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खुन करून अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 430/ 2025 कलम 103(1)305 भारतीय न्याय संहिता अन्वे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास पथक नेमण्यात आले होते .या खुणाचा उलगडा आज दिनांक 23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावुन पुणे येथून एका महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. मयत सुभद्रा पाटील यांच्या शेजारणीनेच पैशाच्या वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम दर्शनी सदर गुन्हा कोणी केला याबाबत पुरावे उपलब्ध नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसमोर मुख्य आव्हान होते. गुन्ह्याची कामगिरी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोकर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा धारशी यांना सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार , पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून पुरावा गोळा करण्यास सुरुवात केली.

तसेच गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनीय माहिती मिळवणे सुरुवात केली त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एक महिला संशयितरित्या घटनास्थळी आजूबाजूला फिरत असल्याचे दिसून आले सदरील महिला कोण आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर महिला ही याच परिसरात राहणारी वनिता झुंबर सुरवसे ही असल्याची समजले त्यावरून नमूद महिलेच्या मुलाकडे तिच्याबाबत चौकशी केला असता ती उपचार कमी ससून रुग्णालय पुणे येथे गेले असल्याची त्यांनी सांगितले त्यावरून एक पथक नेमुण महिलेचा शोध घेणे कामी पुणे येथे पाठविण्यात आले. त्यादरम्यान ती भिगवण येथे राहत असलेल्या तिच्या मुलीकडे असल्याबाबत माहिती मिळाली त्या ठिकाणावरून तीला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे नमूद गुन्हाचे अनुषंगाने चौकशी केली असता तिने उडवा-उडूची उत्तर दिली त्यानंतर  विश्वासघात घेऊन विचारले असता तिनेच सदरील गुन्हा केल्याची असल्याची कबुली दिली. सदर गुन्हामध्ये खून करण्यामागचा उद्देश विचारला असता तिने सांगितले की मयत महिलेकडून आरोपी महिलेने दागिने गहाण ठेवून 40 हजार रुपये उसने घेतले होते आणि त्या मुद्द्यावरून मयत महिलाही आरोपीस सतत त्रास देत होती त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने सुभद्रा पाटील चा 21- 11- 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास खून केला आणि त्याच्या अंगावरील दागिने काढून पुणे येथे पळून गेली होती. सदरील आरोपी महिला नामे वनिता झुंबर सुरवसे राहणार जळकोट ता. तुळजापूर हीच पुढील तपासण्यासाठी नळदुर्ग  पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर  पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या मार्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार साहेब पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार पोलीस हेड कॉन्स्टेबल शौकत पठाण ,पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद काजी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल फरहाण पठाण ,पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश अवताडे ,सुभाष चौरे, रत्नदीप डोंगरे ,नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments