तुळजापूर : तू आमच्या भागात का आलास असे म्हणून एका मूकबधिर तरुणाला अमानुष बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर शहरातील धक्कादायक प्रकार-
धाराशिव : तुळजापूर शहरातील जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात मूकबधीर तरुणावर काठ्या व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना दि,२२ रोजी घडली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या आत्याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे- सुरज हरिश्चंद्र जगदाळे, प्रतिक जगदाळे, गणेश जगदाळे, राजाभाउ देशमाने, शंतनु नरवडे, व इतर सर्व रा. तुळजापूर खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.12.2025 रोजी 19.00 वा. सु. जगदाळे कॉम्प्लेक्स पार्कींग मलबा हॉस्पीटल समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-कांताबाई अभिमान चौगुले, वय 35 वर्षे, रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आत्याचा मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार,वय 32 वर्षे, यास नमुद आरोपींनी तु आमच्या भागात का आलास असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कांताबाई चौगुले यांनी दि.23.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 190, 191(2), 193(3) सह कलम 92 अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments