लग्नानंतर पाचव्या दिवशीच लुटारू दुल्हन सोन्याची दागिने व रोकड घेऊन पसार; नवरदेवाला सहा लाखाचा गंडा! नवरी सह एजंटावर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना -Beed Lutaru Dhulhan Duplicate Marraige

Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नानंतर पाचव्या दिवशीच लुटारू दुल्हन सोन्याची दागिने व रोकड घेऊन पसार; नवरदेवाला सहा लाखाचा गंडा! नवरी सह एजंटावर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना -Beed Lutaru Dhulhan Duplicate Marraige

लग्नानंतर पाचव्या दिवशीच लुटारू दुल्हन सोन्याची दागिने व रोकड घेऊन पसार; नवरदेवाला सहा लाखाचा गंडा! नवरी सह एजंटावर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना -


बीड /प्रतिनिधी रूपेश डोलारे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक करणारे टोळीचा पर्दाफश झाला आहे. पाटोदा तालुक्यातील गंडाळवाडी येथील एका तरुणाचे लग्न लावून दिल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच नवरीने चार लाखाची रोकड आणि दोन लाखाचे दागिने घेऊन पलायन केले याप्रकरणी नवरी सह ५ मध्यस्थीविरुद्ध अमंळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गंडाळवाडी येथील 34 वर्षीय संजय शामराव पवार हे विवाहासाठी मुलीचा शोध घेत होते; याचा फायदा घेत दत्ता पवार (रा. सुपा)आणि पठाण (रा. चोभा निमगाव) या मध्यस्थांनी एका मुलीचे स्थळ सुचविले .पंढरपूर येथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला .यावेळी मुलीची मावशी आणि एका महिला एजन्टने लग्नासाठी चार लाख रुपयांची मागणी केली; संजय यांनी ती रक्कम दिली आणि सांगण्यावरून दोन लाख रुपयाची दागिने खरेदी केली याप्रकरणी आळमनेर पोलीस ठाण्यात दत्ता पंढरीनाथ पवार (रा. सुपा पाटोदा) पठाण (रा. चोभा निमगाव आष्टी )जयश्री रवी शिंदे (रा. पंढरपूर कथीत मावशी) रूपाली बाळू दिशांगंज (रा. लाडगाव नवरी) अनोळखी महिला एजंट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ करत आहेत.

सध्या लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याने व्यवहाराची समस्या जटील झाली आहे मुलाचे वय वाढत चालल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यातून अनेकदा एजंटामार्फत फसवणुकीचे तसेच लुटेरी दुल्हन सारखे प्रकार देखील घडत आहेत.

नवरीने दागिने रोकड घेऊन पाच दिवसातच ठोकली धुम

10 डिसेंबर रोजी रूपाली बाळू दिशागंज राहणार वैजापूर हिच्याशी पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने आणि नंतर गावी धार्मिक विधीने विवाह पार पडला. लग्नानंतर पाच दिवस रूपाली सासरी  नीट राहिली .मात्र 15 डिसेंबरच्या रात्री कोणालाही काही न सांगता ती घरातून दागिने आणि रोकड घेऊन पळून गेली.

धमकावल्यामुळे फसवणूक उघड

संजय यांनी जेव्हा मध्यस्थ्यांना फोन केला तेव्हा त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली 17 डिसेंबर रोजी मुलीशी मावशी जयश्री शिंदे  आणि एजंट महिलेने संजय यांना उलट धमकी दिली की मुलगी आता येणार नाही पुन्हा फोन केला तर तुझ्यावर आणि तुझ्या मित्रावर बलात्काराची केस करू या धमकीमुळे आपली फसवून झाल्याचे संजय याच्या लक्षात आहे.

Post a Comment

0 Comments