बसवंतवाडी शिवारातून पवन ऊर्जा प्रकल्पाचे साहित्य लंपास नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद-
: तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवन ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणांना चोरट्याने टार्गेट करून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयाची अर्थिंगचे केबल, बॉटमम आर्थिंग स्टिरप, स्काडा आर्थिंग स्ट्रिप, केबल कटींग, टॉवर डोअर लॉक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आले आहे. याप्रकरणी नळदृग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारातून. 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान रिन्यु ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनी चे 1 अर्थिंगचे केबल, बॉटमम आर्थिंग स्टिरप, स्काडा आर्थिंग स्ट्रिप, केबल कटींग, टॉवर डोअर लॉक एकुण 1,00,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रावसाहेब भानुदास शेंडे, यांनी दि.13.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments