तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळामध्ये तीन वरिष्ठ मान्यवरांचा सत्कार व केंद्रप्रमुख हाके यांचा निरोप समारंभ संपन्न-Breaking News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळामध्ये तीन वरिष्ठ मान्यवरांचा सत्कार व केंद्रप्रमुख हाके यांचा निरोप समारंभ संपन्न-Breaking News

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळामध्ये तीन वरिष्ठ मान्यवरांचा सत्कार व केंद्रप्रमुख हाके यांचा निरोप समारंभ संपन्न-


तुळजापूर : तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये मंगरूळ बीट शिक्षण विभागातर्फे तीन वरिष्ठ मान्यवरांचा सत्कार व येवती येथील केंद्रप्रमुख हाके यांचा निरोप समारंभ दि २३ रोजी  संपन्न झाला.


 या कार्यक्रमांमध्ये मंगरूळ बीट मधील सर्व आस्थापनांच्या शाळांकडून मा. श्री. माने साहेब(प्रशासनाधिकारी म.न.पा.सोलापूर), मा श्री. चिलवंते साहेब (उपशिक्षणाधिकारी योजना वर्धा), या मान्यवरांचा अभिनंदनपर सत्कार व मा श्री.हाके साहेब (केंद्रप्रमुख येवती) यांच्या निरोप समारंभा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सन्माननीय माजी मंत्री डॉ. लक्ष्मणराव ढोबळे सर यांची उपस्थिती लाभली व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित सर्व शिक्षकांना  ऐकावयास मिळाले . श्री माने साहेब व चिलवंते साहेब यांच्या सेवा कार्यकाळात त्यांनी राबविलेल्या शालेय उपक्रमांमुळे मंगरूळ बीटीच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला हे शिक्षकांच्या मनोगतातून ऐकावयास मिळाले.


याप्रसंगी मा. डॉ. ढोबळे साहेब ,श्री माने साहेब, श्री चिलवंते साहेब, श्री काळे साहेब , श्री हाके साहेब, श्री वाले साहेब व श्री ईश्वर क्षीरसागर मुख्याध्यापक, शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments