धाराशिव : नर्तिका प्रेयसीच्या वादातून विवाहित प्रियकरची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्या प्रकरणी अखेर नर्तिकीवर गुन्हा दाखल-
धाराशिव : कला केंद्रावरील नर्तिकीच्या प्रेमात पडलेल्या अश्रुबा अंकुश कांबळे (रा. रुई ढोकी ता जि धाराशिव )या विवाहित तरुणांनी नर्तिकेसोबत पैशाच्या कारणावरून होत असलेल्या वादास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 9 रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनवणे कॉलेज रोडवर उघडकीस आली. याप्रकरणी चुलत भावाच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे (रा. हरंगुळ तालुका लातूर) या साई कला केंद्रातील नर्तिकी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे घटने पूर्वी ही दोघे चार दिवस सोबत फिरले होते शिखर शिंगणापूर देवदर्शन करून ते गावी परतले होते; परंतु आर्थिक कारणावरून दोघात बिणसले आणि यातूनच अश्रुबाने आत्महत्या केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात अश्रुबा कांबळे यांचा चुलत भाऊ भारत अर्जुन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत अश्रुबा अंकुश कांबळे यांचे लग्न मागील 4 वर्षांपूर्वी झालेली आहे. अश्रुबा कांबळे त्याच्या कुटुंबासह रुई ढोकी गावाकडे राहण्यास होता. मागील सहा महिन्यापासून तो यशोदा स्टोन केशर येडशी येथे कामात जात होता. त्या क्रेशर पासून काही अंतरावर साई कला केंद्र असून तेथील पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे हिच्याशी त्याची प्रेम संबंध प्रकरण होते पूजा वाघमारे ही अश्रुबा सोबत नेहमी घरी येत होती; त्या कारणावरून अश्रुबा कांबळे व त्याची पत्नी साक्षी यांच्यात सतत भांडण तक्रारी वाद होत होते. याच कारणावरून अश्रुबाची पत्नी साक्षी ही माहेरी पुणे येथे निघून गेली होती अश्रुबा कांबळे व पूजा वाघमारे यांचे पण मागील अनेक दिवसापासून पैशाच्या कारणावरून सतत भांडण होत होते.
यामध्ये पूजा वाघमारे ही अश्रुबा यास नेहमी फोन करून साई कला केंद्रावर बोलवत व पैशाची मागणी करत या प्रकाराला अश्रुबा ही वैतागला होतात त्यांनी पूजा कडुन सतत पैशाची मागणी होत असल्याने मी घरातील सोने व पोस्टात भरलेली आरडी ही मोडल्याची फिर्यादी भावास सांगितली होते.दरम्यान याच कारणातून अश्रुबा कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भारत कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळतात येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आला त्यानंतर मृतदेहावर रूई ढोकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ अर्जुन कांबळे यांनी दि.9 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जिल्ह्यात छम छम चा दुसरा बळी
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांनी बार्शी येथील नर्तिका पूजा गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती या आत्महत्येचे घटनेपाटोपाठ आता धाराशिव जिल्ह्यातील रुई ढोकी येथील अश्रुबा कांबळे यांनी नर्तिक धम्मपाल वाघमारे यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कला केंद्रे पुन्हा वादाच्या भौऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. एकंदरीत या आत्महत्या घटनेचे सत्र धाराशिव जिल्ह्यात सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

0 Comments