नातवाच्या नावावर जमीन केल्याच्या रागातून जन्मदात्या बापाचा दगडाने ठेचून खून, वेळाअमावस्या दिवशी घडली घटना पोलिसांनी आरोपीला २ तासात मुसक्या आवळल्या सोलापूर जिल्ह्यातील घटना-
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथे वडील शेतात हिस्सा देत नाहीत सारखे भांडण करतात या कारणावरून मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केलीची धक्कादायक घटना वेळ अमावस्या दिवशी शुक्रवार दिनांक 19 रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे मृताचे नाव महादेव कुसाप्पा पुजारी वय 70 (रा. डोनज तालुका मंगळवेढा) असे असून तो मी नव्हेच असे सांगणारा आरोपी मुलगा काशिनाथ महादेव पुजारी वय (42) याला पोलीस खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केल्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी त्याला दोन तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथे महादेव कुसाप्पा पुजारी हे आपल्या शेतात पत्नी व 22 वर्षीय नातवासह राहत त्यांना साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत व एक मुलगी होती मुलगी व त्यांचा जावई लग्न झाल्यानंतर काही दिवसात वारले त्यावेळी त्यांना दोन वर्षाचा नातू आहे तो महादेव पुजारी यांच्याकडे आहे तो आता 22 वर्षाचा असून आजी-आजोबा यांच्याकडे तो राहतो. काही दिवसापासून आरोपी मुलगा हा जमीन वाटून मागत होता परंतु वडिलांनी जमीन वाटून देण्यास नकार दिला होता माझ्या मृत्यूनंतर तुम्ही जमीन वाटून घ्या असे ते सांगत होते .गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी एक एकर जमीन नातवाच्या नावावर जमीन केल्याने आरोपी व मृत वडील यांच्यात वादावादी होत होती .
19 डिसेंबर रोजी वेळ अमावस्या निमित्त येथील मायाक्का देवीला दुपारचे वेळी नैवेद्य दाखवण्यास मयत महादेव महादेव पुजारी हे गेली होत त्यानंतर येताना शेजारच्या वस्तीवर त्यांनी जेवण करून चार-पाच वाजण्याच्या दरम्यान कॅनॉल च्या रस्त्यावरून शेतातील घराकडे जात असताना मुलगा काशिनाथ पुजारी यांनी वडील महादेव पुजारी यांचा मलगुंडे यांच्या शेताजवळ दगडाने ठेचून खून केला .त्यानंतर तो तिथून पसार झाला मृत तिथे रस्त्यावर पडून असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी याची खबर मृताच्या घरच्यांना दिल्यानंतर या घटनेची फिर्याद विकास कोरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली ;याप्रकरणी महादेव पुजारी हे शेतात वाटणी देत नाहीत जनावरे शेतातील पिकात गेल्याच्या कारणाने भांडण करतात घरात पुरेशी पाणी भरू देत नाहीत याच कारणाचा राग मनात धरून त्यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत करून मुलगा काशिनाथ यांनी त्याचा खून केला असल्याचे विकास कोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे .
त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर विजय पिसे यांनी तातडीने आरोपीला दोन तासात मोठ्या शीताफीतीने ताब्यात घेतली असून त्यांना अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करत आहेत या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे.

0 Comments