नळदुर्गमध्ये तुंबळ हाणामारी :मस्जीदमध्ये हस्तक्षेप करण्याच्या कारणावरून एकाच बेदम मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव: मज्जिद मध्ये हस्तक्षेप करण्याच्या कारणावरून नळदुर्ग मध्ये एकाच बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे याप्रकरणी पाच जनाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दिनांक 14 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास हकीम कुरेशी यांच्या घरात जवळील सार्वजनिक रोडवर घडली.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-मुज्जमील अहमद कुरेशी, विजामौद्दीन हकीम कुरेशी, सईद अहमद कुरेशी, शफिक गुलाम समदानी बाडेवाले, मुख्तदीर गुलाम बाडेवाल सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.12.2025 रोजी 18.15 वा. सु. ते दि.14.12.2025 रोजी 18.30 वा. सु. हकीम कुरेशी यांचे घराजवळील सार्वजनिक रोडवर नळदुर्ग येथे फिर्यादी नामे-अब्दुल अलीम सत्ता शेख, वय 42 वर्षे, रा. रहीम नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मस्जीद मध्ये हस्त क्षेप करण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लाकडी काठी, हातातील पंचाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याच्या धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अब्दुल अलीम शेख यांनी दि.18.12.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 126(2),352, 351(2), 189, 189(2), 191(2)(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

0 Comments