पवनचक्की पोलच्या पैशाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी परस्परविरोधी गुन्हे दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव : पवनचक्की पोल च्या पैशाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी झाल्याची गंभीर घटना तुळजापूर तालुक्यातील वडाचा तांडा येथे दिनांक 20 रोजी घडली याप्रकरणी दोन्ही गटातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी नामे- शिवराम सोमा चव्हाण, मायाबाई शिवराम चव्हाण, अमति शिवराम चव्हाण, विशाल शिवराम चव्हाण, सर्व रा. वडाचा तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.12.2025 रोजी 21.30 वा. सु. वडाचा तांडा येथे फिर्यादी नामे-जयराम सोमा चव्हाण, वय 42 वर्षे, रा. वडाचा तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पवन चक्कीचे पोलच्या पैशाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयराम चव्हाण यांनी दि.21.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
याच प्रकरणात आरोपी नामे-जयराम सोमा चव्हाण, ललिता जयराम चव्हाण, संतोष जयराम चव्हाण, राहुल जयराम चव्हाण, सर्व रा. वडाचा तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.12.2025 रोजी 09.30 ते 10.00 वा. सु. वडाचा तांडा येथे फिर्यादी नामे-शिवराम सोमा चव्हाण, वय 56 वर्षे, रा. वडाचा तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी मायाबाई चव्हाण यांना नमुद आरोपींनी पवन चक्कीचे पैशाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. घराचा दरवाजा तोडून 2,000₹ चे नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराम चव्हाण यांनी दि.21.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 324(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

0 Comments