तुळजापूर :महिना दहा हजार रुपये हप्ता दे नाही दिल्यास मुलास किडनॅप करण्याची धमकी देत तुळजापुरात वाईन शॉपवर तरुणांचा राडा; तीन जणांवर गुन्हा दाखल-
धाराशिव: मुलास अपहरण करण्याची धमकी देत महिन्याला दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत तुळजापुरात वाईन शॉप वर तीन तरुणांनी धुमाकूळ घातल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.याप्रकरणी अमर नाईक यांनी दिलेले फिर्यादीवरून तीन तरुणाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 22 रोजी सायंकाळी तुळजापूरातील जुन्या बस स्थानकासमोरील चेतना वाईन शॉप समोर घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे- प्रशांत कांबळे, बालाजी जाधव, बाबा शेख, रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.12.2025 रोजी 18.00 वा. सु. चेतन वाईन शॉप जुने बसस्थानक जवळ तुळजापूर येथे फिर्यादी नामे-अमर श्रीराम नाईक, वय 52 वर्षे, रा. पंढरपुरकल गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे मुलास नमुद आरोपींनी किडनॅप करण्याची धमकी देवून 3,100₹ चा माल घेवून गेले व दर महा 10,000₹ हाफता दे नाहीतर तुझ्या मुलाला किडनॅप करु अशी धमकी देवून शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमर नाईक यांनी दि.22.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 308(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपासत तुळजापूर पोलीस करत आहेत.

0 Comments