तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या तरुणावर आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव : अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून शिवीगाळ करत असल्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना कळंब तालुक्यातील हळदगाव येथे नालायका दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी घडली आहे याप्रकरणी मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध दिनांक 18 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत नामे-सुभेच्छा संजय खंडागळे, वय 17 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.22.10.2025 रोजी 07.30 ते 09.15 वा. राहते घरातील पत्राचे लोखंडी आडुस गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-रोहीत सुरेश भोसले, रा. रामवाडी ता. जि. धाराशिव यांनी मयत सुभेच्छा हिस वारंवार फोन केल्या मुळे व शिवीगाळ करत असल्याचे त्रासाला कंटाळुन मयत सुभेच्छा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैशाली संजय खंडागळे, वय 40 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.18.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-107, 78, 79 सह कलम 12 पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments