धाराशिव : काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळवे यांची मुख्य संघटक व प्रवक्ता पदी निवड-Dharashiv News
धाराशिव/ प्रतिनिधी रूपेश डोलारे: शेतकरी नेते महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मान. श्री ज्ञानेश्वर साळवे यांची महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या मुख्य संघटक व मुख्य प्रवक्ता पदी निवड करण्यात आली. हि निवड महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री परागजी पष्टे साहेबांनी शेतकरी नेते ज्ञानेश्वर साळवे यांची काँग्रेस पक्षामध्ये करत असलेल्या कामांची व सामाजिक कामांची तसेच शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या अनेक आंदोलनांची दखल घेऊन संघटनेच्या मुख्य संघटन व मुख्य प्रवक्ता पदी निवड केल्याबद्दल शेतकरी वर्गामधून व काँग्रेस पक्षामधून आनंद व्यक्त केला जात आहे. ज्ञानेश्वर साळवे हे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावातील असल्यामुळे धाराशिव जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने देखील आनंद व्यक्त केला जात आहे.
यानिमित्ताने ज्ञानेश्वर साळवे यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभरात शेतमालाला योग्य हमीभाव तसेच सरसकट कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी दहा लाख रुपये मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, आत्महत्याग्रस्त मराठवाडा आणि विदर्भासाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकिंगची मागणी राज्य सरकार समोर प्रखरपणे मांडण्याचे काम देखील काम केले जाणार आहे, प्रत्येक गावामध्ये किसान कमिटी स्थापन केली जाणार या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या समस्या राज्य पातळीवर महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्रखरपणे राज्य सरकार समोर मांडल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी किसान कमिटी मध्ये येणाऱ्या काळामध्ये गावपातळीवर सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे यांनी यानिमित्ताने केले.


0 Comments