धक्कादायक :पोटचा मुलगाच झाला वैरी ; कौटुंबिक वादातून मुलाने केली जन्मदात्या पित्याची दगडाने ठेचून हत्या तुळजापूर तालुक्यातील खळबळजळ घटना -
नळदुर्ग: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरकाप उडवणारी गंभीर घटना समोर आली आहे अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे एका 17 वर्षाच्या मुलाने जन्मदत्या वडिलांची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली आहे . वडिलांनी केलेले दुसरे लग्न व इतर कौटुंबिक कलहातुन वाद विकोपाला गेल्याने ही भीषण घटना शुक्रवार दिनांक 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली या घटनेतील मयत पित्याचे नाव महिपती अंबाजी सुरवसे 45 राहणार मानेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव अशी आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर धुळाप्पा महिपती सुरवसे असे अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली होती अशी की, तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी महिपती अंबाजी सुरवसे वय 45 व त्यांचा अल्पवयीन मुलगा या बापलेकांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता या वादातून शुक्रवारी सायंकाळी चिखली तांडा येथे दोघांमध्ये प्रथम शाब्दिक बाचाबाची होऊन त्यानंतर प्रकरण हाणामारीवर गेले यामध्ये आरोपी मुलाने वडिलांना दगडाने मारहाण करत गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला .या प्रकरणात प्राथमिक तपासास समोर आलेल्या माहितीनुसार मृत महिपती सुरवसे यांचे दुसरे लग्न आणि कुटुंब नियोजन ऑपरेशनच्या कारणावरून घरात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होते. याच वादातून संताप्त झालेल्या अल्पवयीन मुलाने शेतात वडिलांच्या डोक्यात मोठा दगड घातला हा हल्ला इतका भीषण होता की महिपती यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मयत महिपती यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई अंबाजी सुरवसे वय 70 यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली असून तो अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 )अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला लवकरच बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
शेतीत वाटेकरी होऊ नये म्हणून वडिलांचा काढला काटा
मयत महिपती अंबाजी सुरवसे यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर इराप्पा या महिलेची दुसरा विवाह केला होता पहिल्या पत्नीपासून त्यांना धुळाप्पा हा मुलगा आहे वडिलांनी दुसरा विवाह केल्यानंतर सावत्र आई इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन न केल्याने भविष्यात अपत्य होऊन शेतीत दुसरा वाटेकरी निर्माण होईल असा संशय धुळाप्पा यांच्या मनात होता याच कारणावरून तो वडीलावर राग धरून होता.

0 Comments