धाराशिव: तिसरी बायको करण्यास विरोध केल्याने सख्या भावासह भावजयीला बेदम मारहाण धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव: तिसरी बायको करण्यास का अडथळा आणतोस या कारणावरून सख्ख्या भावासह भावाच्या बायकोलाही बेदम मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 28 रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी अनिल उद्धव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन सख्ख्या भावा विरोधत ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे- दादा उध्दव चव्हाण, सुनिल उध्दव चव्हाण, रा. रोजश्वर पारधी पीडी ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.28.12.2025 रोजी 20.00 वा. सु. राजेशनगर ढोकी येथे फिर्यादी नामे-अनिल उध्दव चव्हाण, वय 35 वर्षे, रा. राजेशनगर पारधी पिडी ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तिसरी बायको करण्यास का अडथळा आणतोस या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे पत्नी राणीबाई, अनुसया उर्फ चिंगीबाई या भांडण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यानाही मारहाण करुन डावे हाताचा खांदा फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिल चव्हण यांनी दि.30.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे ढोकी येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.

0 Comments