गडचिरोलीच्या गजानन गेडाम यांचा साताऱ्यात सन्मान
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे: दिनांक १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे ९९ वा अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडला. यात कवी कट्टा या मंचावर गडचिरोली येथील गजानन भिकाजी गेडाम यांचा सन्मान करण्यात आला.
या साहित्य संमेलनाला राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री मा.आशिषजी शेलार सह मराठी भाषा संचालक सह महाराष्ट्राचे नेते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अखिल भारतीय साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन होते ज्यामध्ये नाटक गझल कविता चर्चासत्र मुलाखत आणि अनेक संकल्पनांचा अवलंब होता.यामधील कवी कट्टा या मंचाकरिता एकूण १७५० कविता आलेल्या होत्या,ज्यामध्ये ४५० कवितांची निवड करण्यात आली. या ४५० कवितांमध्ये गडचिरोली येथील समाजसेवक कवी गजानन गेडाम यांची बोलीभाषेतील "मायबापाची सर" या कवितेची निवड करण्यात आली व ३ जानेवारीला सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्टा मंचावर ती सादर करण्याची संधी देण्यात आली.
या कवितेची प्रशंसा कविसंमेलनाचे अध्यक्ष यांनी अतिशय मार्मिक आणि मन खेचक असा करत गोड कौतुक केले... यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गजानन गेडाम यांचा सन्मान करण्यात आला.

0 Comments