नळदुर्ग : कुटुंब नियोजन ऑपरेशनच्या कारणावरून मुलाने केला जन्मदात्या बापाचा डोक्यात दगड घालून खून ;तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : दुसरे लग्न केल्यानंतर पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही या कारणावरून जन्मदात्या पित्यास मुलाने डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे घडली आहे .ही घटना दिनांक 16 रोजी घडली याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिपती सुरवसे यांचे दुसरे लग्न आणि कुटुंब नियोजनाच्या वादावरून यांच्या घरामध्ये वारंवार भांडणे होती. याच रागातून अल्पवयीन मुलाने जन्मदात्या बापाचा दगडाने ठेचून खून केला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी नामे-धुळप्पा महिपती सुरवसे रा. मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.01.2026 रोजी 17.30 वा. सु.पुर्वी अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात मयत नामे-महिपती आंबाजी सुरवसे, वय 45 वर्षे, रा.मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दुसरे लग्न केले व पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही या करणावरुन दगड डोक्यात घालून जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे, वय 70 वर्षे, रा. मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदृग पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले आहेत. एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात आपल्या स्वतःच्या जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या टोकाच्या पावलामुळे मानेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments