उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळल्याच्या कारणावरून एकाच बेदम मारहाण; एक जनावर गुन्हा दाखल-Paranda Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळल्याच्या कारणावरून एकाच बेदम मारहाण; एक जनावर गुन्हा दाखल-Paranda Police Station Crime News

उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळल्याच्या कारणावरून एकाच बेदम मारहाण; एक जणांवर गुन्हा दाखल- 


धाराशिव : उपनगराध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी काठीने मारहाण करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना परंडा शहरात घडली आहे याप्रकरणी एक जनाविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-गौस उर्फ टॅगो मुक्तार शेख, रा. सिकलकर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी  दि.14.01.2026 रोजी 21.30 वा. सु.कुर्डूवाडी रोड शिवरत्न हॉटेलवर परंडा येथे फिर्यादी नामे-कलीम उत्ताउर रहेमान मुजावर, वय 48 वर्षे, रा.सोमवार गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने उपनगरअध्यक्ष निवडणुकीत गुलाल उधळण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मोबाईल फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कलीम मुजावर यांनी दि.16.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments