तुळजापुर तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्ष पदी अँड.जयवंत इंगळे तर सचिव पदी अँड.पाठक विजयी.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
![]() |
| विजयानंतर आनंद उत्सव साजरा करताना वकील बांधव |
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
उपाध्यक्ष पदासाठी अँड. अंजली साबळे यांची बिनविरोध निवड.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुका विधिज्ञ मंडळ यांची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये सत्ताधारी पॅनलचा पराभव करून अँड.जयवंत इंगळे यांच्या पॅनलने दणदणीत विजयी प्राप्त केला. अध्यक्ष पदाचे उमेदवार अँड. जयवंत इंगळे हे 28 मतांनी विजयी झाले.
शनिवार दिनांक 17 रोजी तुळजापूर तालुका विधिज्ञ मंडळ यांचे निवडणूक पार पडली.या निवडणूकीत निवडणूक अधिकारी म्हणून अँड टी.बी.जगताप सहाय्यक निवडणूक अधिकारी अँड बालाजी देशमाने अँड एस एल कापसे अँड एस बी गायकवाड तसेच अँड हुंडेकरी अँड हंगरगेकर यांनी काम पाहिले.शनिवारी सकाळी 9 ते 3 या कालावधी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर 4 वाजता मतमोजणी सुरुवात झाली.
उपाध्यक्ष पदासाठी अँड अंजली साबळे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. अध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष या पदासाठी मतदान झाले.
एकूण मतदान 148 एवढे झाले.यापैकी अध्यक्षपदाचे उमेदवार अँड जयवंत शिवाजीराव इंगळे यांना 87 मते मिळाली तर त्यांचे विरोधक पराभूत उमेदवार
अँड विवेक विजयकुमार हिरोळीकर यांना 59 मते मिळाली.28 मतांनी अँड इंगळे विजयी झाले.तर सचिव पदासाठी अँड परिक्षीत पाठक यांना 78 मते प्राप्त झाली तर त्यांचे विरोधक पराभूत उमेदवार अँड जनक पाटील यांना 57 मते मिळाली.तसेच अँड मतिन बांडेवाला यांना 9 मते मिळाली.
सहसचिवचे उमेदवार अँड रफिक फुटाणकर यांना 100 मते मिळाली तर त्यांचे विरोधक पराभूत उमेदवार अँड स्वाती फुलारी मॅडम यांना 46 मते प्राप्त झाली.
कोषाध्यक्ष पदासाठी अँड नितीन चंदनशिवे यांना 80 मते मिळाली तर त्यांचे विरोधक पराभूत उमेदवार अँड आर शिंदे यांना 64 मध्ये मिळाली. विजयी अध्यक्ष, सचिव सर्व उमेदवाराचे ज्येष्ठ व युवक वकिलाने अभिनंदन केले.


0 Comments