हृदयद्रावक घटना : ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून बीडच्या रीलस्टारचा मृत्यू; पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच डोळ्यांसमोर गेला जीव-
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे: उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील कूनर्जी शुगर संचलित भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना येथे ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर खाली सापडून एका ऊसतोड कामगार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना समोर आली आहे .शनिवार दिनांक 3 रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास महेंद्रा कंपनीचे मिनी ट्रॅक्टर घेऊन जात होते यावेळी महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर च्या क्रमांक एम एच २४ बी आर -7908 या त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालून डोंगरे यांच्या मिनी ट्रॅक्टर ला धडक दिली .या अपघातात गणेश डोंगरे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले विशेष म्हणजे मयत गणेश डोंगरे हा सोशल मीडियावरील रीलस्टार होता आणि दुर्दैवाने त्यांची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना तिच्या डोळ्यात देखत हा अपघात घडला या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळूहळू व्यक्त केली जात आहे याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की राज्यात बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उसाच्या हंगामात येथील लाखो कुटुंबे उदरनिर्वासाठी राज्याच्या विविध भागात तसेच राज्यात ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवाशी गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडीसाठी बाहेर पडले होते. शनिवार दिनांक 3 रोजी दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास महिंद्रा कंपनीची मिनी ट्रॅक्टर घेऊन जात होते दरम्यान क्युनर्जी शुगर्स भाउसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ येथे महिंद्र अर्जुन ट्रॅक्टर च्या क्रमांक एम एच २४ -BR- 7908 वाहनचालकानी त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवुन डोंगरे यांच्या मिनी ट्रॅक्टर ला धडक दिली या अपघातात गणेश डोंगरे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. तर बाबा नवनाथ नागरगोजे जखमी झाले या घटनेमुळे त्यांची वृद्ध आई-वडील पत्नी आणि त्यांचे तीन चिमुकली मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .याप्रकरणी भरत अश्रुबा डोंगरे यांनी रविवार दिनांक 4 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून लोहारा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉलीला धडक पत्नीच्या डोळ्यादेखत घडली दुर्घटना
यावर्षी ते धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे असलेल्या क्युनर्जी शुगर्स भाउसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शनिवार दिनांक 3 रोजी दुपारच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याचवेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरची गणेशच्या ट्रॉलीला अचानक धडक बसली या भीषण अपघातात गणेशाच्या जागीच मृत्यू झाला तर बाबा नवनाथ नागरगोजे हा कामगार जखमी झाला आहे. काही क्षणातच अश्विनीच्या डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं या अपघाताची वेळी मयत गणेशची पत्नी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती लाईव्ह सुरू असताना ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यात देखत ही दुर्घटना घडतात तिच्यावर जणू आभाळच कोसळलं काही क्षणात ती बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पसरले आणि संपूर्ण जिल्हातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोहारा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
यामध्ये मयत नामे-गणेश नामदेव डोंगरे, वय 32 वर्षे, व सोबत बाबा नवनाथ नागरगोजे रा. डोंगरेवाडी ता. वडवणी जि. बीड हे दि.03.01.2026 रोजी 13.15 वा. सु. महिंद्रा कंपनीचे मिनी ट्रॅक्टर चेसी नंबर MBNMEB5KKPZE या वरुन जात होते. दरम्यान क्युनर्जी शुगर्स भाउसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ येथे महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर क्र एमएच 24 बीआर 7908 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून गणेश डोंगरे यांचे मिनी ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात गणेश डोंगरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर बाबा नवनाथ नागरगोजे हे जखमी झाले. फिर्यादी नामे-भरत अश्रुबा डोंगरे रा. डोंगरेवाडी ता. वडवणी जि. बीड यांनी दि.04.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1),281, 125(अ), सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments