अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून, शर्टवरील टेलरच्या नावाने मृतदेहाची ओळख उमरगा तालुक्यातील घटना- Umerga Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून, शर्टवरील टेलरच्या नावाने मृतदेहाची ओळख उमरगा तालुक्यातील घटना- Umerga Murder Crime News

अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा  दगडाने ठेचून खून, शर्टवरील टेलरच्या नावाने मृतदेहाची ओळख; पत्नीसह प्रियकरास अटक उमरगा तालुक्यातील घटना- 



धाराशिव : उमरगा शहरातील एका तरुणाचा अनैतिक संबंधाचा अडथळा होत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच प्रियकरच्या मतीने खट्टा खाल्याच्या समोर आली आहे ही घटना रविवार दिनांक चार रोजी सकाळी उमरगा तालुक्यातील कोरेगाव वाडी रोडवर शेतात उघडकीस आली आहे यामध्ये आरोपीने दगडाने ठेचून मयताचा चेहरा विद्रुप केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते ;परंतु पोलिसांनी मयताचा  शर्ट वरील टेलरच्या नावावरून माहिती काढत नाही त्याची ओळख पटवली आहे तसेच या प्रकरणात तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत संशयित म्हणून पत्नीसह तिच्या प्रियकरा सह ताब्यात घेतली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शाहुराज  महादेव सूर्यवंशी असे मयत पतीचे नाव आहे तर गौरी शिवराज सूर्यवंशी असे पत्नीचे नाव आहे तसेच  शिवाजी दत्तु दुधनाळे रा.ञिकोळी ता उमरगा असे प्रियकराचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की रविवार दिनांक 4 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोरेगाव वाडी रोडवरील एका बाजू शेतामध्ये एका इसमाचा खून झाला असून सदरील मृतदेह पालथ्या स्थितीत पडल्याची माहिती उमरगा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रेत सरळ करून पाहिले असता त्याचा पूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला दिसून आला या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व मोबाईल फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आय.एल मेघना यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी मृतदेहाजवळ कोणत्याही पुरावा अथवा ओळख पटवणारी वस्तू नसताना शर्टच्या कॉलरवर असलेले एका एस के  टेलरच्या मार्क वरून पोलिसांनी तपास सुरू केला त्यावरच खाली टेलरचा मोबाईल नंबर असल्याने पोलिसांनी तात्काळ शोध घेतला असता तो टेलर उमरगा शहरातील जुनी पेठ येथील असल्याचे समोर आले . तात्काळ त्याला घटनास्थळी बोलावून घेतली अशी टेलर मार्क व त्याखाली मोबाईल नंबर लिहिलेल्या असल्यामुळे त्यावर संपर्क साधून लागलीस टेलरला बोलून घेतले .तसेच मृतदेहाच्या हातावर गोरी हे नाव गोंदवले होते. त्यानुसार जूनीपेठ भागात चौकशी केली असता गौरी हे शाहुराज महादेव सूर्यवंशी यांच्या पत्नीचे नाव असल्याचे समोर आले .

त्यानुसार मयताची भावजयी अलकाबाई रमेश सूर्यवंशी यांना मृतदेहाचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी हा दीर शाहुराज महादेव सूर्यवंशी याचा मृतदेह असल्याचे सांगितले त्यानुसार तपासाला आणखी गती मिळाली तपास दरम्यान पोलिसांना शाहूराज यांची पत्नी गौरी व गावातीलच एका तरुणाच्या अनैतिक संबंध बाबत माहिती मिळाली.त्यानुसार संशयित म्हणून सदरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर पत्नीनेच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून प्रियकरच्या मदतीने पतीचा खून केल्याची  माहिती समोर आली. त्यानुसार संबंधित प्रियकरासह पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments