तुळजापूर : प्रत्येक गावच्या विकासाचे होणार आता 'मास्टर प्लॅनिंग' तुळजापूर पंचायत समितीत झाली प्रशिक्षण कार्यशाळा-Tuljapur Panchyatsamati Trainigschool

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : प्रत्येक गावच्या विकासाचे होणार आता 'मास्टर प्लॅनिंग' तुळजापूर पंचायत समितीत झाली प्रशिक्षण कार्यशाळा-Tuljapur Panchyatsamati Trainigschool

तुळजापूर : प्रत्येक गावच्या विकासाचे होणार आता 'मास्टर प्लॅनिंग' तुळजापूर पंचायत समितीत झाली प्रशिक्षण कार्यशाळा-


 तुळजापूर  : तालुक्यातील ग्रामपंचायतचा विकास अधिक नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक १ जानेवारी  ते 3 जानेवारी या कालावधीमध्ये पार पडले. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान सन 2025 -26 अंतर्गत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी "आमचं गाव आमचा विकास "जीपीडीपी या उपक्रमांतर्गत सन 2026 -27 चा विकास आराखडा तयार करण्याबाबत हे प्रशिक्षण देण्यात आले.

 यामध्ये मारुती बनसोडे हे प्रवीण प्रशिक्षणार्थी व विस्ताराधिकारी अवघतराव कावळे व ज्योती नाईक विस्ताराधिकारी पंचायत यांनी कार्यशाळेची यशस्वीरित्या मार्गदर्शन देऊन पूर्ण करण्यात आले. या कार्यशाळेची उद्घाटन पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे  यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना भिंगारदिवे साहेब म्हणाले की ,"ग्रामविकासात  लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे गावच्या गरजा ओळखून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला विकास आराखडा शास्त्रीय पद्धतीने तयार केल्यास गावच्या सर्वांगीण विकासात  भर पडेल .

या कार्यशाळेत मास्टर ट्रेनर मारुती बनसोडे आणि पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आगोतराव कावळे व ज्योती नाईक विस्ताराधिकारी यांनी उपस्थित सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी व निधी चोख नियोजन कशा करायचे याबाबत सविस्तर या प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली .याप्रसंगी प्रत्येक गावचे सरपंच हे उपस्थित होते.तसेच  गावच्या विकासामध्ये भर कशा पद्धतीने होईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले .यामध्ये ग्राम पंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद भाऊ रेड्डी व सय्यद व गोरोबा गायकवाड ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments