अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा ; प्रियकराला दिली 25 हजाराची सुपारी 24 तासात लावला खुनाचा छडा दोन आरोपी गजाआड-Hingoli Murder Case Crime
हिंगोली प्रतिनिधी : एका 55 वर्षीय आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या 28 वर्षीय मुलाची निर्गुण हत्या केली याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. सचिन रामकिशन राजगुरू वय (28) रा. वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा असे मयत तरुणाचे नाव आहे .अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याच्या रागातून आईनेच मुलाला संपल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक 8 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात प्रकाश चव्हाण यांच्या शेताजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची तोंड दगडाने ठेचून ओळख मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली मयताच्या हातावर असलेल्या टॅटू चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले त्यावरून मयत हा बुलढाणा जिल्ह्यातील वडव येथील असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तांत्रिक तपासाचे आधारे संशयित रामदास विश्राम तनपुरे वैभव वय (65) याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवतात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मयताची आई लिलाबाई रामकिशन राजगुरू हिचे रामदास तनपुरे यांच्याशी अनैतिक संबंध होते यात सचिन अडथळा ठरत असल्याने लिलाबाईच्या सांगण्यावरून रामदासने नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपये सुपारी दिली .सचिनला पाहुण्याकडे जायचे आहे असे सांगून सेनगाव परिसरात आणले गेले. जामदाया शिवारात निर्जन स्थळी सचिनची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ;आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला यातून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. हिंगोली पोलिसांनी फॉरेन्सिक पथक आणि सायबर सेलच्या मदतीने अवघ्या 24 तासात या खुनाचा उलगडा केला या प्रकरणीला लीलाबाई राजगुरू आई रामदास तनपुरे प्रियकर आणि नरेश पवार सुपारी घेणारा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवार दिनांक 10 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी या तपासाची सविस्तर माहिती दिली सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के दिलीप मोरे पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केला.
पाहुण्यांकडे जायचे सांगून घेऊन गेले आणि डोक्यात दगड घातला
तपासासाठी पोलीस लोणार तालुक्यातील वडव या गावात पोहोचले आरोपी रामदास विश्राम तनपुरे वय (65) याची विचारपूस केली तेव्हा सचिन राजगुरू यांची आई लिलाबाई हिच्या सोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या संबंधात सचिन याचा अडसर होत होता त्यामुळे लिलाबाई हिच्या सांगण्यावरून रामदास तानपुरे यांनी नरेश साबण्या पवार यास २५ हजार रुपये दिले पाहुण्यांकडे जायचे आहे असे सांगून रामदास तनपुरे आणि नरेश पवार हे दोघे सचिनला घेऊन निघाले. साखरा येथे त्यास दारु पाजून जामदा या शहरात डोक्यात दगड घालून त्याची खून केल्याची कबुली आरोपीने दिली या प्रकरणातील पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.

0 Comments